1 तुमची माहिती
अधिक पर्याय
भरती निवडल्यास तिची कट-ऑफ तारीख इथे आपोआप भरली जाते.
2 भरती निवडा
चालू भरतींची वयोमर्यादा
हेच आकडे वरचे कॅल्क्युलेटर वापरते. प्रत्येक ओळीसोबत अधिकृत जाहिरातीची लिंक आहे — अंतिम माहिती तिथेच.
| भरती | वयोमर्यादा | वय मोजण्याची तारीख | शेवटची तारीख | जाहिरात |
|---|---|---|---|---|
| ONGC अप्रेंटिस भरती 2026: 3,047 जागा — महाराष्ट्रात 482 तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) | 18 – 24 वर्षेसवलत: OBC +3, SC (अनुसूचित जाती) +5, ST (अनुसूचित जमाती) +5, दिव्यांग (PwD) +10 | 29 नोव्हेंबर 2026 | 20 नोव्हेंबर 2026 | पहा |
| RRB स्टेशन मास्टर भरती 2026: रेल्वेमध्ये 1,265 जागांसाठी भरती रेल्वे भरती मंडळ (RRB) — भारतीय रेल्वे | 20 – 33 वर्षेसवलत: OBC +3, SC (अनुसूचित जाती) +5, ST (अनुसूचित जमाती) +5 | 1 जानेवारी 2027 | 25 नोव्हेंबर 2026 | पहा |
| MPSC गट-क 2026: जागा 5,707 वरून 16,717 — नव्याने अर्जाची संधी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) | 18 – 39 वर्षेसवलत: OBC +5, SC (अनुसूचित जाती) +5, ST (अनुसूचित जमाती) +5, vj_a +5, nt_b +5, nt_c +5, nt_d +5, SBC +5, EWS +5, orphan +5 | 1 ऑक्टोबर 2026 | 27 नोव्हेंबर 2026 | पहा |
| मध्य रेल्वे अप्रेंटिस 2026: 2,861 जागा (10वी + ITI) — सर्व ठिकाणं महाराष्ट्रात रेल्वे भरती कक्ष, मध्य रेल्वे (RRC/CR) | 15 – 24 वर्षेसवलत: OBC +3, SC (अनुसूचित जाती) +5, ST (अनुसूचित जमाती) +5, दिव्यांग (PwD) +10 | 3 नोव्हेंबर 2026 | 2 डिसेंबर 2026 | पहा |
| IOCL पाइपलाइन्स अप्रेंटिस 2026: 500 जागा — महाराष्ट्रात 13 इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. — पाइपलाइन्स विभाग | 18 – 24 वर्षेसवलत: OBC +3, SC (अनुसूचित जाती) +5, ST (अनुसूचित जमाती) +5, दिव्यांग (PwD) +10 | 30 नोव्हेंबर 2026 | 5 डिसेंबर 2026 | पहा |
| उत्तर रेल्वे अप्रेंटिस 2026: 4,651 जागा (10वी + ITI) — ठिकाण उत्तर भारत रेल्वे भरती कक्ष, उत्तर रेल्वे (RRC/NR) | 15 – 24 वर्षेसवलत: OBC +3, SC (अनुसूचित जाती) +5, ST (अनुसूचित जमाती) +5, दिव्यांग (PwD) +10 | 11 डिसेंबर 2026 | 11 डिसेंबर 2026 | पहा |
| असम रायफल्स भरती 2026: तांत्रिक व ट्रेड्समन पदांच्या 354 जागा असम रायफल्स — गृह मंत्रालय, भारत सरकार | 18 – 25 वर्षेसवलत: OBC +3, SC (अनुसूचित जाती) +5, ST (अनुसूचित जमाती) +5 | 1 जुलै 2026 | 14 डिसेंबर 2026 | पहा |
जन्मतारीख टाका आणि चालू भरतीसाठी वय किती आहे, पात्रता आहे का, आणि कमाल वयोमर्यादा संपायला किती दिवस उरले आहेत ते पाहा.
वयोमर्यादा, कट-ऑफ तारीख आणि प्रवर्गाची सवलत त्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीतून घेतलेली आहे. आम्ही कोणताही "सर्वसाधारण" वयाचा नियम गृहीत धरत नाही.
कसे वापरायचे
- जन्मतारीख टाका — शाळेच्या दाखल्यावरची, फॉर्ममध्ये तीच भरायची असते.
- भरती निवडा — आम्ही त्या जाहिरातीची वयोमर्यादा आणि कट-ऑफ तारीख आपोआप लावतो. यादीत नसेल तर "स्वतः वयोमर्यादा टाका".
- प्रवर्ग निवडा — त्या भरतीत जाहीर केलेली सवलत कमाल वयात जोडली जाते.
- निकाल वाचा — वय वर्षे-महिने-दिवसांत, पात्र की अपात्र, आणि कमाल मर्यादा संपेपर्यंत किती दिवस.
- अधिकृत जाहिरात उघडा — अर्ज करण्यापूर्वी वयाची अट तिथे पुन्हा तपासा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
वय कोणत्या तारखेला मोजले जाते?
जाहिरातीत दिलेल्या कट-ऑफ तारखेला — ती सहसा अर्जाची शेवटची तारीख नसते. वर भरती निवडल्यावर, आमच्याकडे त्या भरतीची कट-ऑफ तारीख असेल तर ती आपोआप भरली जाते आणि तसे स्क्रीनवर सांगितले जाते.
प्रवर्गाची सवलत कुठून येते?
ती त्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीतून आलेली आहे आणि तीच वापरली जाते. आम्ही "सर्वसाधारण" सवलत गृहीत धरत नाही — प्रवर्गाची सवलत भरतीनुसार वेगळी असते, म्हणून यादीत तुमची भरती नसेल तर "स्वतः वयोमर्यादा टाका" वापरा.
"पात्र ✓" दिसले म्हणजे अर्ज करता येईल का?
वयाच्या अटीपुरते. शिक्षण, शारीरिक पात्रता, अनुभव, अधिवास आणि इतर अटी हे टूल तपासत नाही. अंतिम निर्णय अधिकृत जाहिरातीचा — ती पूर्ण वाचा.
29 फेब्रुवारीला जन्म असेल तर?
वाढदिवस सामान्य वर्षात 1 मार्च धरला जातो, म्हणजे 28 फेब्रुवारीपर्यंत वय एक वर्ष कमी दिसते. हीच पद्धत बहुतेक फॉर्मची असते, पण अशा वेळी तुमच्या जाहिरातीतील नियम एकदा तपासून पाहा.
जन्मतारीख तुमच्याकडे जाते का?
नाही. जन्मतारीख फक्त तुमच्या ब्राउझरमध्येच वापरली जाते — ती कुठेही पाठवली जात नाही, साठवली जात नाही, आणि आमच्या आकडेवारीतही कधीही नोंदवली जात नाही.
फॉर्म भरला? आता तयारीही करा.
रोजची चालू घडामोडी टेस्ट, भरती रिमाइंडर आणि परीक्षेनुसार मॉक टेस्ट — Study Katta ॲपमध्ये, मोफत.