तुमचे फोटो, कागदपत्रे, नाव आणि तारीख आमच्या सर्व्हरवर जात नाहीत — सर्व काम तुमच्या फोन किंवा कॉम्प्युटरमध्येच होते.
चौकट ओढा किंवा कोपऱ्यातून आकार बदला.
अधिक पर्याय
सरकारी फॉर्म फोटो नेमक्या पिक्सेल मापात आणि नेमक्या KB मर्यादेत मागतो. इथे फोटो निवडा, हवा तेवढा भाग क्रॉप करा, जाहिरातीतील माप आणि KB टाका — बाकीचे टूल करते.
कसे वापरायचे
- फोटो निवडा — फोनवर कॅमेरा किंवा गॅलरी, कॉम्प्युटरवर फाइल.
- क्रॉप करा — चौकट ओढून चेहरा मध्यभागी आणा. "आउटपुट प्रमाणात लॉक" ठेवल्यास फोटो ताणला जात नाही.
- माप आणि KB टाका — जाहिरातीत दिलेले px (किंवा cm + DPI) आणि जास्तीत जास्त / किमान KB.
- तयार करा — टूल quality शोधून लक्ष्य KB मध्ये बसवते आणि अंतिम माप व KB दाखवते.
- डाउनलोड करा — फाइलचे नाव आपोआप माप आणि KB सह मिळते, म्हणून अपलोड करताना गोंधळ होत नाही.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
फॉर्मसाठी फोटोचे माप किती असावे?
ते तुमच्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत दिलेले असते आणि बोर्डानुसार बदलते. आम्ही कोणत्याही परीक्षेचे माप स्वतःहून सांगत नाही — जाहिरातीत जे px आणि KB दिले आहेत तेच इथे टाका. टूलमध्ये आधीच भरलेले 200×230 px आणि 20–50 KB हे केवळ उदाहरण आहे.
माझा फोटो KB मर्यादेत बसत नाही, काय करावे?
टूल JPEG quality टप्प्याटप्प्याने कमी करून मर्यादेत बसवण्याचा प्रयत्न करते. सर्वात कमी quality वरही फाइल मोठी राहिली, तर तसे स्पष्ट सांगितले जाते — अशा वेळी रुंदी × उंची कमी करा. मोठे माप आणि फार कमी KB एकत्र शक्य नसते.
किमान KB ची अट असेल तर?
quality वाढवून फाइल मोठी करण्याचा प्रयत्न होतो. सर्वोच्च quality वरही फाइल किमान KB पेक्षा लहान राहिली, तर आम्ही ती कृत्रिमरीत्या फुगवत नाही — त्याऐवजी माप वाढवा (उदा. दुप्पट करा), म्हणजे फाइलमध्ये खरोखर जास्त माहिती येईल.
माझा फोटो तुमच्या सर्व्हरवर जातो का?
नाही. फोटो निवडल्यावर तो फक्त तुमच्या ब्राउझरच्या मेमरीत उघडला जातो, तिथेच क्रॉप आणि रिसाइज होतो, आणि डाउनलोड फाइलही तुमच्याच डिव्हाइसमध्ये तयार होते. कोणतीही अपलोड विनंती होत नाही — इंटरनेट बंद करूनही टूल चालते.
cm मध्ये माप दिले असेल तर?
एकक cm निवडा आणि DPI टाका (स्कॅन केलेल्या फोटोसाठी साधारण 300). टूल त्याचे पिक्सेलमध्ये रूपांतर करून दाखवते, म्हणजे फॉर्मला हवे तेवढेच पिक्सेल मिळतात.
फॉर्म भरला? आता तयारीही करा.
रोजची चालू घडामोडी टेस्ट, भरती रिमाइंडर आणि परीक्षेनुसार मॉक टेस्ट — Study Katta ॲपमध्ये, मोफत.