Download app ॲप मिळवा
Home › टूल्स › JPG → PDF

JPG/फोटो → PDF, KB मर्यादेसह

अनेक फोटो एकाच PDF मध्ये, क्रम तुमचा. KB मर्यादा पाळली जाते.

तुमचे फोटो, कागदपत्रे, नाव आणि तारीख आमच्या सर्व्हरवर जात नाहीत — सर्व काम तुमच्या फोन किंवा कॉम्प्युटरमध्येच होते.

बहुतेक फॉर्म कागदपत्रे एकाच PDF मध्ये, ठरलेल्या KB मर्यादेत मागतात. फोटो निवडा, क्रम लावा, पान आकार आणि KB मर्यादा ठरवा — PDF तुमच्या ब्राउझरमध्येच तयार होते.

कसे वापरायचे

  1. फोटो निवडा — एकदाच अनेक, किंवा टप्प्याटप्प्याने.
  2. क्रम लावा — वर-खाली बाणांनी. चुकीचा फोटो ✕ ने काढा.
  3. पान आकार निवडा — प्रिंटसाठी A4, फक्त अपलोडसाठी "मूळ".
  4. KB मर्यादा टाका — फॉर्ममध्ये दिलेली. मर्यादा नको असेल तर 0.
  5. PDF तयार करा आणि डाउनलोड करा — पाने आणि अंतिम KB स्क्रीनवर दिसते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

किती फोटो एकत्र जोडता येतात?

मर्यादा नाही — प्रत्येक फोटो एक पान होतो. मात्र सगळे काम तुमच्या फोनमध्येच होते, म्हणून 20–25 पेक्षा जास्त पाने जुन्या फोनवर हळू होऊ शकतात.

पानांचा क्रम बदलता येईल का?

हो. यादीत प्रत्येक पानाशेजारी वर-खाली बाण आहेत, आणि चुकीचा फोटो काढून टाकण्यासाठी ✕. क्रम जसा यादीत दिसतो तसाच PDF मध्ये येतो.

A4 आणि "मूळ" यात फरक काय?

A4 मध्ये प्रत्येक फोटो A4 पानावर मध्यभागी, छोट्या मार्जिनसह बसवला जातो — कागदपत्रे प्रिंट करायची असतील तर हे योग्य. "मूळ" मध्ये पान फोटोएवढेच असते, कोणतीही पांढरी किनार नसते — केवळ अपलोडसाठी हे बरे.

KB मर्यादा कशी पाळली जाते?

टूल फोटोंची JPEG quality टप्प्याटप्प्याने कमी करून, मर्यादेत बसणारी पहिली PDF ठेवते. सर्वात कमी quality वरही PDF मोठी राहिली तर तसे स्पष्ट सांगितले जाते — अशा वेळी पाने कमी करा किंवा मर्यादा वाढवा.

फोटो कुठे अपलोड होतात का?

नाही. PDF तुमच्या ब्राउझरमध्येच तयार होते — फोटो वाचणे, quality कमी करणे आणि PDF जुळवणे हे सगळे तुमच्या डिव्हाइसवर. इंटरनेट बंद करूनही हे टूल चालते.

फॉर्म भरला? आता तयारीही करा.

रोजची चालू घडामोडी टेस्ट, भरती रिमाइंडर आणि परीक्षेनुसार मॉक टेस्ट — Study Katta ॲपमध्ये, मोफत.

ॲप डाउनलोड करा