Download app ॲप मिळवा
Home › टूल्स › PDF लहान करा

PDF ची साइज कमी करा — KB मर्यादेत

स्कॅन केलेली कागदपत्रे ठरलेल्या KB मर्यादेत बसवा. पाने, DPI आणि काळा-पांढरा पर्याय तुमचा.

तुमचे फोटो, कागदपत्रे, नाव आणि तारीख आमच्या सर्व्हरवर जात नाहीत — सर्व काम तुमच्या फोन किंवा कॉम्प्युटरमध्येच होते.

बहुतेक फॉर्म स्कॅन केलेली कागदपत्रे ठरलेल्या KB मर्यादेत मागतात, आणि स्कॅनरमधून आलेली PDF त्या मर्यादेच्या कितीतरी पट असते. इथे PDF निवडा, गुणवत्ता आणि KB मर्यादा ठरवा — नवीन PDF तुमच्या ब्राउझरमध्येच तयार होते.

कसे वापरायचे

  1. PDF निवडा — स्कॅन केलेली कागदपत्रे, 30 पानांपर्यंत.
  2. गुणवत्ता (DPI) निवडा — 150 बहुतेक वेळा योग्य. फाइल फार मोठी असेल तर 100.
  3. KB मर्यादा टाका — फॉर्ममध्ये दिलेली. मर्यादा नको असेल तर 0.
  4. काळा-पांढरा — स्कॅन केलेला कागद असेल तर फाइल बरीच लहान होते.
  5. PDF लहान करा आणि डाउनलोड करा — आधीची आणि नंतरची KB स्क्रीनवर दिसते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मजकूर असलेली PDF लहान केली तर काय होते?

तिचा मजकूर चित्र बनतो. फाइल दिसायला तशीच राहते, पण त्यातला मजकूर copy करता येत नाही, शोधता येत नाही आणि screen reader वाचू शकत नाही. म्हणून हे टूल स्कॅन केलेल्या कागदांसाठी आहे — मार्कशीट, दाखले, जातीचा दाखला. टाइप केलेल्या फॉर्मसाठी ते वापरू नका.

DPI म्हणजे काय, आणि कोणता निवडू?

एका इंचात किती ठिपके — म्हणजे पान किती बारकाईने उतरवले जाते. 150 बहुतेक कागदपत्रांसाठी योग्य आहे. फाइल फारच मोठी असेल तर 100, आणि बारीक अक्षरे वाचता आली पाहिजेत अशा दाखल्यासाठी 200. DPI कमी केल्यावर फाइल लहान होते पण बारीक अक्षरे धूसर होतात.

निकाल मूळ फाइलपेक्षा मोठा आला, असे का?

कारण ती PDF आधीच लहान होती — सहसा ती स्कॅन नसून थेट संगणकावर तयार झालेली मजकूर-PDF असते. अशा फाइलीत मजकूर अतिशय कमी जागा घेतो, आणि त्याचे चित्र बनवले की जागा वाढते. असे झाल्यास टूल तसे स्पष्ट सांगते — मूळ फाइलच वापरा.

किती पानांची PDF चालते?

जास्तीत जास्त 30. सगळे काम तुमच्या फोनमध्येच होते आणि प्रत्येक पानासाठी मेमरी लागते — त्यापेक्षा मोठ्या फाइलवर फोन थांबतो किंवा tab बंद होतो. 30 पेक्षा जास्त पाने असतील तर PDF भागांत विभागून प्रत्येक भाग स्वतंत्रपणे लहान करा.

पासवर्ड असलेली PDF चालेल का?

नाही. पासवर्डने संरक्षित फाइल उघडता येत नाही आणि टूल तसे सांगते. आधी पासवर्ड काढा, मग फाइल निवडा.

फाइल कुठे अपलोड होते का?

नाही. PDF वाचणारी लायब्ररीसुद्धा याच साइटवरून येते, कुठल्याही बाहेरच्या सर्व्हरवरून नाही. पान एकदा उघडल्यावर इंटरनेट बंद करूनही हे टूल चालते — हीच खात्री आहे की तुमची कागदपत्रे कुठेही जात नाहीत.

फॉर्म भरला? आता तयारीही करा.

रोजची चालू घडामोडी टेस्ट, भरती रिमाइंडर आणि परीक्षेनुसार मॉक टेस्ट — Study Katta ॲपमध्ये, मोफत.

ॲप डाउनलोड करा