1 तुमची माहिती
अधिक पर्याय
भरती निवडल्यास तिची कट-ऑफ तारीख इथे आपोआप भरली जाते.
2 भरती निवडा
चालू भरतींची वयोमर्यादा
हेच आकडे वरचे कॅल्क्युलेटर वापरते. प्रत्येक ओळीसोबत अधिकृत जाहिरातीची लिंक आहे — अंतिम माहिती तिथेच.
| भरती | वयोमर्यादा | वय मोजण्याची तारीख | शेवटची तारीख | जाहिरात |
|---|---|---|---|---|
| NICL AO भरती 2026: नॅशनल इन्शुरन्समध्ये 321 जागा नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (National Insurance Company Ltd.) | 21 – 30 वर्षेसवलत: OBC +3, SC (अनुसूचित जाती) +5, ST (अनुसूचित जमाती) +5, दिव्यांग (PwD) +10 | 1 ऑक्टोबर 2026 | 28 ऑक्टोबर 2026 | पहा |
| सर्वोच्च न्यायालय भरती 2026: ज्युनियर कोर्ट असिस्टंटच्या 250 जागा भारताचे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of India) | 18 – 30 वर्षेसवलत: OBC +3, SC (अनुसूचित जाती) +5, ST (अनुसूचित जमाती) +5, दिव्यांग (PwD) +10 | 1 सप्टेंबर 2026 | 28 ऑक्टोबर 2026 | पहा |
| RRB NTPC भरती 2026: भारतीय रेल्वेत पदवीधरांसाठी 3548 जागा रेल्वे भरती मंडळ (Railway Recruitment Boards) | 18 – 33 वर्षेसवलत: OBC +3, SC (अनुसूचित जाती) +5, ST (अनुसूचित जमाती) +5, दिव्यांग (PwD) +10 | 1 जानेवारी 2027 | 6 नोव्हेंबर 2026 | पहा |
| RRB NTPC भरती 2026: रेल्वेत 12वी पाससाठी 1688 जागा रेल्वे भरती मंडळ (Railway Recruitment Boards) | 18 – 30 वर्षेसवलत: OBC +3, SC (अनुसूचित जाती) +5, ST (अनुसूचित जमाती) +5, दिव्यांग (PwD) +10 | 1 जानेवारी 2027 | 13 नोव्हेंबर 2026 | पहा |
जन्मतारीख टाका आणि चालू भरतीसाठी वय किती आहे, पात्रता आहे का, आणि कमाल वयोमर्यादा संपायला किती दिवस उरले आहेत ते पाहा.
वयोमर्यादा, कट-ऑफ तारीख आणि प्रवर्गाची सवलत त्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीतून घेतलेली आहे. आम्ही कोणताही "सर्वसाधारण" वयाचा नियम गृहीत धरत नाही.
कसे वापरायचे
- जन्मतारीख टाका — शाळेच्या दाखल्यावरची, फॉर्ममध्ये तीच भरायची असते.
- भरती निवडा — आम्ही त्या जाहिरातीची वयोमर्यादा आणि कट-ऑफ तारीख आपोआप लावतो. यादीत नसेल तर "स्वतः वयोमर्यादा टाका".
- प्रवर्ग निवडा — त्या भरतीत जाहीर केलेली सवलत कमाल वयात जोडली जाते.
- निकाल वाचा — वय वर्षे-महिने-दिवसांत, पात्र की अपात्र, आणि कमाल मर्यादा संपेपर्यंत किती दिवस.
- अधिकृत जाहिरात उघडा — अर्ज करण्यापूर्वी वयाची अट तिथे पुन्हा तपासा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
वय कोणत्या तारखेला मोजले जाते?
जाहिरातीत दिलेल्या कट-ऑफ तारखेला — ती सहसा अर्जाची शेवटची तारीख नसते. वर भरती निवडल्यावर, आमच्याकडे त्या भरतीची कट-ऑफ तारीख असेल तर ती आपोआप भरली जाते आणि तसे स्क्रीनवर सांगितले जाते.
प्रवर्गाची सवलत कुठून येते?
ती त्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीतून आलेली आहे आणि तीच वापरली जाते. आम्ही "सर्वसाधारण" सवलत गृहीत धरत नाही — प्रवर्गाची सवलत भरतीनुसार वेगळी असते, म्हणून यादीत तुमची भरती नसेल तर "स्वतः वयोमर्यादा टाका" वापरा.
"पात्र ✓" दिसले म्हणजे अर्ज करता येईल का?
वयाच्या अटीपुरते. शिक्षण, शारीरिक पात्रता, अनुभव, अधिवास आणि इतर अटी हे टूल तपासत नाही. अंतिम निर्णय अधिकृत जाहिरातीचा — ती पूर्ण वाचा.
29 फेब्रुवारीला जन्म असेल तर?
वाढदिवस सामान्य वर्षात 1 मार्च धरला जातो, म्हणजे 28 फेब्रुवारीपर्यंत वय एक वर्ष कमी दिसते. हीच पद्धत बहुतेक फॉर्मची असते, पण अशा वेळी तुमच्या जाहिरातीतील नियम एकदा तपासून पाहा.
जन्मतारीख तुमच्याकडे जाते का?
नाही. जन्मतारीख फक्त तुमच्या ब्राउझरमध्येच वापरली जाते — ती कुठेही पाठवली जात नाही, साठवली जात नाही, आणि आमच्या आकडेवारीतही कधीही नोंदवली जात नाही.
फॉर्म भरला? आता तयारीही करा.
रोजची चालू घडामोडी टेस्ट, भरती रिमाइंडर आणि परीक्षेनुसार मॉक टेस्ट — Study Katta ॲपमध्ये, मोफत.